औरंगाबाद: मागील दोन वर्षांपूर्वी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली होती; परंतु काही विद्यार्थ्यी पुराव्याअभावी प्रमाणपत्र काढून शकले नाहीत. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र विभागातही गोंधळ निर्माण झाला होता. आता पुन्हा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातच जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे. इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर होताच काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात, तर काही विद्यार्थी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी प्रमाणपत्र सेतू सुविधा केंद्रातून काढणे गरजेचे आहे. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रही काढणे आवश्यक आहे.
यासाठी विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेताना सेतू सुविधा केंद्रात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र विभागात गर्दी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होते आणि प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठीही विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. तसेच कमी वेळेत काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे काढता येत नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश द्यावे लागतात. तर आर्थिक परिस्थिती खालावलेली असलेल्या विद्यार्थ्यांना तर प्रवेशापासून वंचितच राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाच जात प्रमाणपत्राबरोबर जातपडताळणी प्रमाणपत्र काढावे या उद्देशाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांना द्यावे लागणार आहे. अन्यथा दुसर्या वर्षातप्रवेशही मिळणार नाही.